श्रीमती प्रभावती भास्करराव शिंगणे

दुःखद वार्ता
सहकारमहर्षी स्व.भास्कररावजी शिंगणे यांच्या धर्मपत्नी, माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब यांच्या मातोश्री व बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या माजी अध्यक्ष, मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या काकू श्रीमती प्रभावती भास्करराव शिंगणे यांचे आज सोमवार १५ सप्टेंबर रोजी वृद्धापकाळाने सायंकाळी ४.३० वाजता वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवार १६ सप्टेंबर रोजी बुलढाणा येथे अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती निकटवर्ती यांनी दिली.

डॉ. राजेंद्र शिंगणे साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिवेशन व मोर्चासाठी नाशिकला गेलेले असल्याने अजून अंत्यसंस्काराची वेळ ठरली नाही.

