सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
आष्टी :- आष्टी- चंद्रपूर महामार्गावर ट्रकची लांबच लांब रांग; वाहतुकीस अडथळा
आष्टी ते चंद्रपूर महामार्गावर रोज सूरजागड लोह प्रकल्प चे हजारो ट्रक ये जा करीत असतात तसेच रस्त्याच्या कडेला जवळपास 500 ट्रक उभ्या रांगेत असतात त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रवास करताना दमछाक होत आहे, तरी प्रशासन व ट्राफिक पोलीस याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष्य करत असल्याचे चित्र दिसत आहॆ सुरजागड च्या रोजच्या ट्रक वाहतुकीमुळे सामान्य नागरीक,एस टी महामंडळ च्या रोजच्या प्रवासाला अडथळा निर्माण होत आहे,मोठ मोठे उद्योग गडचिरोली जिल्यात उभारले पण वाहतुकीस रस्ते,आणि नियम याकडे प्रशासनाचे अजिबात लक्ष्य नाही, परिणामी या सतत ट्रक वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे तरी प्रशासन गप्प का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. ट्रकची लांबच लांब रांग लागल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ट्रक थांबून राहिल्यामुळे महामार्गावर वाहतुकीचा वेग मंदावला असून ये जा करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे मात्र सकाळपासून दुपारपर्यंत प्रवासी आणि वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असल्यामुळे मोठी गैरसोय झाली आहे.रात्रीच्या वेळी या ट्रक च्या रस्त्याच्या कडेला हजारो ट्रकची रांग असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे तरी प्रशासनाणे याकडे लक्ष देऊन आष्टी चंद्रपूर मार्ग हा सुरळीत करावा अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे.
चंद्रपूर- बल्लारशा इथून चालन करायला मात्र ट्रॅफिक अधिकारी हजर पण वाहतुकीच्या समस्येसाठी प्रशासनाला वेळ नाही.
