
गडचिरोली : जिल्ह्यातील विविध भुसंपादनासंदर्भात नागरिकांना येणाऱ्या शासकीय अडचणी त्वरित दूर करण्यासाठी भाजप प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
जिल्हा भुसंपादन अधिकारी जसप्रीत प्रधान व अप्पर जिल्हाधिकारी संजय आस्वले यांच्यासोबत झालेल्या चर्चेत भुसंपादित वर्ग १ व २ च्या जागेच्या अधिकार हक्कांबाबत जनतेला येणाऱ्या अडचणींचा आढावा घेण्यात आला. शेतकरी व नागरिकांची अन्याय होऊ नये, तसेच त्यांच्या हक्काच्या जमिनी व मोबदल्याबाबत कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये याकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशा सूचना माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी बैठकीत दिल्या.
या चर्चेत संबंधित विभागीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील भूसंपादनाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावून शेतकरी व नागरिकांना न्याय मिळावा यावर भर देण्यात आला.


