
अमोल मारकवार | तालुका प्रतिनिधी

अहेरी:- दरवर्षी प्रमाणे यंदाही नवरात्री उत्सवात अहेरी येथील आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यात नवदुर्गा मातेचे प्राण प्रतिष्ठापना करण्यात आले.
आमदार डॉ.धर्मराव बाबा आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम, युवा नेते हर्षवर्धनराव बाबा आत्राम व राजपरीवारातील अन्य सदस्य व प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत भक्तिमय वातावरणात राजवाड्यात रविवार 11 ऑक्टोबर रोजी नवदुर्गा मातेचे प्राणप्रतिष्ठापना करण्यात आले.
दरवर्षी नवरात्री उत्सवात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येते. यंदाही बुधवार 14 ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या व नवदुर्गा मातेच्या शुभ पर्वावर स्नेहा लाँन येथे गरबा _दांडियाचे भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आले आहे.
राजवाड्यात नवदुर्गा मातेच्या दर्शनासाठी व आरतीसाठी नित्यनेमाने सकाळी व सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी व रेलचेल असते.


