
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली

देसाईगंज,दि.१२ ऑक्टोबर : महाविकास आघाडी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी देसाईगंज येथील लाखांदूर टी-पॉईंट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनादरम्यान मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेणे तसेच एसआयआर (SIR) प्रक्रिया रद्द करणे, या प्रमुख मागण्या करण्यात आल्या. प्रत्येक पात्र नागरिकाचा मतदानाचा अधिकार सुरक्षित राहावा आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता असावी, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.

या प्रसंगी माजी सभापती परसरामजी टिकले, काँग्रेस कमिटीचे देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा कुरखेडा तालुकाध्यक्ष जीवन पाटील नाट, कोरची तालुकाध्यक्ष मनोज अग्रवाल, काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष आरमोरी मिलिंद खोब्रागडे,माजी उपसभापती नितीन राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य रामसुराम काटेंगे, काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत हरडे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर मेश्राम, डॉ श्रीकांत बन्सोड, विलास ठाकरे,माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी,काँग्रेस कमिटी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घोडाम, माजी सभापती गिरीधर तीतराम, गजानन सेलोटे,ओबीसी काँग्रेस कमिटी अध्यक्ष अरुण कुंभलवार, वाशिम शेख,संदीप वाघाडे,युवक काँग्रेस कमिटी विधानसभा अध्यक्ष कमलेश बारस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य जयमाला पेंदाम, काँग्रेस कमिटी सोशल मीडिया अध्यक्ष कैलास वानखेडे, परशुराम ठाकरे, शैलेश बगमारे,ऋषी बगमारे, हंसराज लांडगे,दुर्वास नाईक, गजेंद्र नाईक, काँग्रेस कमिटी तालुका उपाध्यक्ष सुरेश मेश्राम,सुरेश तोंडफोडे,प्रकाश समर्थ, वैष्णवी आकरे,नगरसेविका आशाताई दहिवले, नगरसेविका मंदा समर्थ, नगरसेविका राधिका पत्रे, नगरसेविका गुरमीतकौर चावला, मनोहर खेकारे,सागर बन्सोड, देवा शहारे, नंदू चावला, दादाजी गावतुरे, विठ्ठल हारगुडे, अथर्व राणे, निलेश दुपारे, देवनाथ सयाम, नरहरी तुमराम, राजकुमार मेश्राम,यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

