
आभारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर; १२ ऑक्टोबर रोजी गडचिरोली येथे अंत्यसंस्कार

गडचिरोली (चामोर्शी): भेंडाळा येथील डॉ. अमित आभारे यांच्या पत्नी सुषमा अमित आभारे यांचे रविवार, दिनांक ११ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आभारे व रोहनकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सुषमा आभारे यांचा जन्म २६ जून १९९२ रोजी झाला होता. अल्पवयातच त्यांची जीवनयात्रा संपल्याने कुटुंबीय, नातेवाईक आणि परिचितांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाची बातमी समजताच आप्तस्वकीयांकडून दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

त्यांच्यावर सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी १२.१५ वाजता गडचिरोली येथील वैनगंगा नदीच्या काठावरील मूल रोड परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
भावपूर्ण श्रद्धांजली!
सौ. सुषमा अमित आभारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून परमेश्वराने त्यांच्या आत्म्यास शांती प्रदान करावी आणि आभारे व रोहनकर परिवाराला या दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे, हीच प्रार्थना.

