
जय चवडेश्वरी युवा गणेश मंडळाचा पुढाकार; रात्री ८ ते पहाटे ६ वाजेपर्यंत भव्य दंडार महोत्सव

चामोर्शी : झाडीपट्टीच्या समृद्ध पारंपरिक लोककलेचा जागर घडवून आणण्यासाठी चामोर्शी शहरात आज, मंगळवार, ६ ऑक्टोबर रोजी भव्य दंडार लोकनाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तेलंग मोहल्ला, वॉर्ड क्रमांक २ येथील कापेवार-बेलदार भवनजवळ जय चवडेश्वरी युवा गणेश मंडळ, चामोर्शी यांच्या वतीने हा सांस्कृतिक सोहळा रंगणार आहे.
या महोत्सवात जय बजरंग बली नाट्य दंडार मंडळ, चेक बेरडी यांच्याकडून पारंपरिक दंडार लोकनाट्याची दमदार प्रस्तुती केली जाणार आहे. रात्री ८ वाजता सुरू होणारा हा कार्यक्रम थेट सकाळी ६ वाजेपर्यंत चालणार असून, दंडारच्या पारंपरिक सादरीकरणासह मनोरंजनाची मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.

दंडार ही केवळ मनोरंजनाची कला नसून झाडीपट्टीच्या ग्रामीण संस्कृती, परंपरा आणि लोकजीवनाचे प्रतिबिंब मानली जाते. आधुनिक मनोरंजनाच्या युगातही या लोककलेची परंपरा जिवंत ठेवण्यासाठी अशा सांस्कृतिक उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित होत आहे. चामोर्शीत आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवामुळे कलाकारांना व्यासपीठ मिळण्याबरोबरच नागरिकांना आपल्या मातीतल्या लोककलेचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे.
या भव्य दंडार महोत्सवाचा नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घ्यावा तसेच झाडीपट्टीच्या पारंपरिक लोककलेच्या जतन व संवर्धनाला पाठबळ द्यावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
आयोजक : साईनाथ यादव पेशट्टीवार, पंकज पेशट्टीवार, दिपक सदुलवार, साईनाथ मारोती पेशट्टीवार, पुरुषोत्तम पेशट्टीवार, किशोर मस्कावार, रमेश गोपावार, जनार्धन रेड्डीवार, दामोधर तुप्पल्लीवार, अनिल प्रिसिंगलवार, मनोहर पेशट्टीवार, संतोष गोपावार, आशिष कार्लेवार, महेश जटांगलवार, उमेश गोपावार, संतोष कागदेलवार, बंडुजी बापुलवार, किशोर बुरांडे, गंगेश अल्लीवार, अनिल वरगन्टीवार, हरबा प्रिसिंगलवार, पत्रू पुठ्ठावार व जय चवडेश्वरी युवा गणेश मंडळ, चामोर्शी.

