
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत चामोर्शी शहरात उत्साहपूर्ण वातावरणात भव्य बाईक रॅली काढण्यात आली.
हातात तिरंगा घेऊन सहभागी झालेल्या नागरिकांनी ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

या रॅलीत उपविभागीय अधिकारी संपत खलाटे , तहसीलदार प्रशांत घोरुडे , पोलीस निरीक्षक महादेव ढाकणे , ,उपनगराध्यक्ष लोमेश बुरांडे , गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, सीडीपीओ विनोद हटकर, नायब तहसीलदार तारकेश फुलझेले न.प. अधिक्षक सेहल दहिवले ,यांच्या प्रमुख उपस्थितीसह नगरपंचायत कर्मचारी, पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी , शिक्षक , तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
तिरंग्यांनी सजलेल्या दुचाकींच्या ताफ्यामुळे चामोर्शीच्या रस्त्यांवर देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला. रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचा संदेश देत नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, एकता आणि देशभक्तीची भावना अधिक दृढ करण्यात आली.
तिरंग्याच्या अभिमानाने चामोर्शी दुमदुमले; ‘हर घर तिरंगा’चा संदेश जनमानसात पोहोचविणारी ही रॅली लक्षवेधी ठरली.
सदर तिरंगा रॅलीची सुरुवात उपविभागीय कार्यालय ते गांधी पेट्रोलपंप , मुल-आष्टी टि पाईट , लक्ष्मीगेट, बसस्टॉप ते नगरपंचायत येथे रॅलीचे समारोप करण्यात आले .

