
नितेश गट्टीवार गडचिरोली/सिरोंचा:
कृषी उत्पन्न बाजार समिती, सिरोंचा अंतर्गत भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. नागपूर यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे उद्घाटन आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते उत्साहपूर्ण व जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडले.या उद्घाटन सोहळ्यामुळे सिरोंचा शहरासह परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमस्थळी आ. डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे जंगी स्वागत केले. घोषणाबाजी, टाळ्यांचा कडकडाट आणि जल्लोषात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चना करून फित कापत अत्याधुनिक पेट्रोल पंपाचे लोकार्पण करण्यात आले.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लि. नागपूर यांच्या सहकार्याने उभारण्यात आलेला हा पेट्रोल पंप आधुनिक सुविधांनी सुसज्ज असून वाहनधारकांसाठी मोठी सोय ठरणार आहे. सिरोंचा शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांना आता इंधनासाठी दूरवर जावे लागणार नसल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळेची व आर्थिक बचत होण्यास मदत होणार आहे.

