
नितेश गट्टीवार गडचिरोली दि.१० मे :
गुरुवळा गावाला प्रत्यक्ष भेट देऊन गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान तसेच जिल्हाध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटी गडचिरोली महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी शेतकरी बांधवांशी सविस्तर संवाद साधला.
यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शेत अधिग्रहणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत आपल्या समस्या व भावना खासदार डॉ. किरसान यांच्या समोर मांडल्या. अनेक शेतकऱ्यांनी शेती हीच आपल्या उदरनिर्वाहाचे एकमेव साधन असल्याचे सांगत अधिग्रहणामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या अडचणींची माहिती दिली. खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी शेतकऱ्यांच्या भावना समजून घेत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या व शासन स्तरावर या प्रश्नाबाबत योग्य पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.

शेतकरी बांधवांच्या न्याय हक्कासाठी काँग्रेस पक्ष खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभा राहील. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही तसेच त्यांच्या हक्कासाठी आवश्यक तेवढा संघर्ष करण्यात येईल, असा विश्वास खासदार डॉ. नामदेव किरसान आणि जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी शेतकऱ्यांना दिला.
यावेळी परिसरातील शेतकरी बांधव, काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

