नितेश गट्टीवार
गडचिरोली (चामोर्शी):दि.१५ मार्च
मौजा मुधोली चक नं २येथे प्रस्तावित औद्योगिक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या जमीन अधिग्रहण प्रक्रियेला स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांनी ठाम विरोध दर्शविला आहे. या संदर्भात ग्रामस्थांनी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार चामोर्शी यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले की, दिनांक दहा ते 14 दरम्यान पोलीस बंदोबस्तात ड्रोन च्या सहाय्याने जमीन मोजणी सुरू असून ही प्रक्रिया शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होत आहे तसेच वरद फेरो अलायज कंपनीकडून मुधोली चेक नंबर दोन परिसरात स्पंज आर्यन प्लांट, इंडक्शन फर्नेस रोलिंग मिल, फोर्जिंग, पिलिंग ,ब्राईट बार, इग्नोट कास्टिंग पावर प्लांट आर्क फर्नेस उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यासाठी सुमारे 78. 99 हेक्टर जमीन अधिसूचित करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आहे .मात्र या संदर्भात स्थानिक शेतकरी व ग्रामस्थांशी कोणतीही सविस्तर चर्चा किंवा संमती घेण्यात आलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
