
प्रतिनिधी/रुपेश सलामे
गडचिरोली : ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कार्यालय नगर परिषद, गडचिरोली येथे आयोजित कार्यक्रमात नगर परिषद उच्चश्रेणी प्राथमिक शाळा, रामपूर, गडचिरोली येथील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीत कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
ही कवायत मुख्याध्यापिका सौ. नैना चन्नावर यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या तालबद्ध हालचाली, शिस्त आणि समन्वय पाहून उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली. नगराध्यक्ष ॲड. सौ. प्रणोती सागर निंबोरकर, मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर व उपस्थितांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.


