
प्रतिनिधी/रुपेश सलामे
.जोगीसाखरा- निसर्ग मानवाला खूप काही देत असतो याची जाण ठेवून, निसर्गाचं देणं आहे या कृतज्ञतेच्या भावनेतून प्रत्येक नागरिकाने पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्यासाठी वृक्षारोपण करून किमान एक तरी झाड लावावे, वृक्ष लागवड ही एक व्यापक चळवळ निर्माण करुण, जगा, जगवा अन् जगू दया हा जीवन मंत्र आत्मसात करुन वृक्षारोपणाची सामाजिक बांधिलकी चळवळ घरा घरात पोहोचावे असे आवाहन आमदार रामदास मसराम यांनी केले.
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ठाणेगाव नदी घाट मशानभुमि परीसरात कसलेली प्रकारचें झाडें नसल्यामुळे नागरीकांना मृत्यू पावलेल्याना व्यक्तीना उन्हाळ्याच्या दिवसात जाळत असताना उन्हाचे चटके आवरण्यासाठी झाडेच नसल्याने उन्हाचे चटके लागत होते यासाठी झाड प्रेमी मित्र मंडळ, ठाणेगाव’ नवीन यांनी पुढाकार घेऊन आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमदार रामदास मसराम यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून व ‘कंपाऊंड’चे उद्घाटन करण्यात आले.त्यावेळी मसराम बोलत होते.
यावेळी आरमोरी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष दिलीप घोडाम धनपाल मिसार अँन्ड.राजसाहेब सुकदेवे प्रशांत ख्रोबागडे महेंद्र कुकडकर संजय लोथे सिकंदर नदरधने गितेश उपरीकर अक्षय लोथे अशिक लोणारे गोलु लोथे आशिष दुधबळे गोलु बनकर प्रज्वल प्रधान प्रभाकर भुरसे ईशांत लट्टे निखिल बेदेवार यासह अन्य नागरिक उपस्थित होते.
या प्रसंगी लोकसभातुन विविध प्रकारचे झाडे लावून अम्पाऊन जाळी लावण्यात आले.

