
प्रतिनिधी/रुपेश सलामे
गडचिरोली:- वैरागड येथील सार्वजनिक भागवत सप्ताह समिती तथा समस्त गावकरी वृंद यांच्या वतीने आयोजित श्रीमद् भागवत ज्ञानयज्ञ कार्यक्रमास आमदार श्री. रामदासजी मसराम यांनी भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी उपस्थित भाविकांशी संवाद साधत धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे समाजातील महत्त्व विशद केले.
भागवत कथेमुळे समाजात सद्भावना, नैतिक मूल्ये आणि सांस्कृतिक एकात्मता वृद्धिंगत होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला योग्य दिशा मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्यांनी सार्वजनिक भागवत सप्ताह समिती व ग्रामस्थांचे कौतुक केले.

त्या प्रसंगी उपस्थित: काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष महेंद्रभाऊ ब्राम्हणवाडे,माजी आमदार देवराव होळी, माजी.जी.प. उपाध्यक्ष मनोहर पा. पोरेटी, आरमोरी ता. अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, धनपाल मिसार सर,माजी. जी. प. सदस्य केशवजी गेडाम, माजी उपसभापती विनोद बावणकर, उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमिटी दिलीप घोडाम, सरपंच संगीताताई पेंदाम, संगीताताई मेश्राम, विश्वासजी भोवते, दत्तूभाऊ सोमणकर, गौरव येनपरेड्डीवार, राहुल भांडेकर, महेंद्र लटारे, जावेद खान उपस्थित होते.

