korchi news

श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची
येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात दरवर्षी होणारा प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम, या दरम्यान होणारा विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम, ठेकेदाराच्या व्यत्ययामुळे तहसील कार्यालयाच्या प्रांगणात झाला नाही. विद्यार्थ्यांच्या मनातील अपेक्षित राष्ट्रभावना जागृत झाली नाही. अशी खंत तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी व्यक्त केली.

रस्त्यावर सुरू असलेल्या सीडी वर्कमुळे ठेकेदाराने ( एका न्युज चॅनेलच्या वार्ताहरच्या ठेकेदार पत्नीने ) पोचमार्ग न काढता, तहसील कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद केला. त्या मार्गे जाणारे टू व्हीलर वाहन चालक जीव मुठीत धरून घातक मार्गाने जातात. बरेच लोक पडले आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तहसीलदार प्रशांत गड्डम यांनी कार्यक्रम तहसील कार्यालयात होऊ देण्यास नकार दिला. शाळेत किंवा पर्यायी ठिकाणी करा, असे सुचविले. त्यामुळे सदर कार्यक्रम बाजार चौकात घडवून आणला.


परंतु कोरचीत 26 जानेवारी 2026 हा प्रजासत्ताक दिन यन्दा फक्त तारीख राहीला. तो दिवस बनू शकला नाही. वर्षानुवर्षे तहसील कार्यालयाच्या आवारात, त्या तिरंग्याच्या खाली, झेंडा वन्दनानन्तर होणारा सांस्कृतिक कार्यक्रम, जिथे मुलांच्या आवाजात राष्ट्रगीत, वन्देमातरम गुन्जतो, जीथे छोट्या पावलांनी सामुदायिक नृत्य सादर होताना राष्ट्रभक्ताची लाट उभी राहते, तो सर्व काही यन्दा अनुपस्थित राहीला.
जरी काही जनानी बाजार चौकात हा कार्यक्रम घडवून आणला, गर्दीत, दुकानाच्या आवाजात, वाहतुकीच्या धुळीत, मुलांनी गाणी म्हटली, नृत्य केले, लोक थांबले, टाळ्या वाजवल्या, पण त्या टाळ्या तहसील कार्यालयाच्या शांत, अधिकृत, ईतिहासाने ओतप्रोत वातावरणातील टाळ्यासारख्या नव्हत्या. तिथे पोलीसान्ची परेड पाहुन मुलांना वाटत होते, आम्ही देशासाठी काहीतरी करू. बाजार चौकात ते फक्त कार्यक्रम करत होते.
कोरची तालुका 1992 ला झाला. तेव्हापासून हि परन्परा सुरु होती. प्रत्येक 26 जानेवारी ला तहसील कार्यालय हे मुलांसाठी फक्त एक ईमारत नव्हती, ती एक भावना होती, एक प्रेरणा होती, एक ओळख होती. तिथे झेंडा फडकताना मुलांना वाटायचे हा आमचा देश आहे, हा आमचा राष्ट्रध्वज आहे. आम्ही त्याचे रक्षण करणार. आज ती ओळख कमी झाली. बाजार चौकात झेंडा फडकला पण तो झेंडा मुलांच्या मनात फडकला नाही.
ठेकेदाराच्या एका चुकीच्या निर्णयामुळे, पोचमार्ग न ठेवण्याच्या एका हलगर्जी पणाने केवळ रस्ता बन्द झाला नाही, अनेक मुलांच्या मनात राष्ट्रभक्तीती ती पहिली, खरी, अढळ ज्योत मन्दावली.
आता एकच मागणी आहे – रस्ता लवकर पूर्ण करा, पोचमार्ग द्या, पण त्याहुन मोठी मागणी आहे – पुढच्या वर्षी तहसील किर्यालयाच्या त्या आवारात पुन्हा तिरंगा फडकवण्याची मुलांना डोळ्यात पुन्हा तिच चमक आणण्याची. कारण राष्ट्रभक्ती ही फक्त गाणी आणि नृत्य नाही, ती एक खोलवर रूजणारी भावना आहे. जी एकदा हरविली की सहज परत येत नाही.


