
सोनू वाळके,गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
चामोर्शी :-
चामोर्शी येथील राहुल लोक विकास मंडळाचे संस्थापक सचिव दिवंगत बा. म. सहारे गुरुजी यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली .
याप्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य शाम रामटेके होते. विशेष अतिथी म्हणून रा.लो.मं चे कोषाध्यक्ष वक्तूजी उंदिरवाडे , लक्ष्मण गव्हारे, राजू धोडरे होते. अध्यक्ष शाम रामटेके यांनी सहारे गुरुजी यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजू धोडरे , संचालन जयश्री कोठारे तर आभार सरिता आखाडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरु सातपुते, प्रवीण नैताम, निलेश क्षिरसागर, लोकनाथ दुधबळे , प्रा. प्रेमानंद वालदे
प्रा. प्रदीप भांडेकर, प्रा. प्रवीण गव्हारे आशाताई उंदीरवाडे आणि शालेय मंत्री मंडळाच्या सदस्यांनी सहकार्य केले.


