
नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली, दि. २७ जून : आ.डाॅ.मिलिंद नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांची बैठक सर्किट हाऊस, गडचिरोली येथे पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, मतदार जनजागृती आणि शहराच्या सर्वांगीण विकासासंदर्भातील विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत ‘मन की बात’ कार्यक्रमाचे प्रभावी आयोजन करून सरल ॲपवर नियमित अपलोड करणे, विशेष मतदार पुनर्निरीक्षण (SIR) अंतर्गत नवीन मतदार नोंदणी, बोगस मतदारांची पडताळणी व वगळणे, बूथ प्रमुखांना अधिक सक्रिय करणे, समाजमाध्यमांवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना फॉलो करणे, पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडणे तसेच पक्षाच्या पोस्ट नियमित शेअर व रीपोस्ट करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल प्लॅटफॉर्मवरील प्रशिक्षणावरही विशेष भर देण्यात आला.

याशिवाय प्रत्येक प्रभागातील विकासकामांना गती देणे, प्रलंबित कामे पूर्ण करणे, मुलांसाठी खेळाची मैदाने व मोकळी जागा उपलब्ध करून देणे, ग्रीन गडचिरोली अभियानांतर्गत वृक्षारोपण व संगोपन, शहरातील कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, मटण व मच्छी मार्केटचे नियोजन, अंडरग्राऊंड वीज केबल प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी तसेच अतिक्रमणमुक्त, स्वच्छ, सुंदर आणि नियोजनबद्ध गडचिरोली घडविण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली.
नागरिकांच्या अपेक्षांनुसार विकासकामांना गती देत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने व सक्रियपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीस गडचिरोली नगराध्यक्षा ॲड. प्रणोतीताई निंबोरकर, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, शहराध्यक्ष तथा बांधकाम सभापती अनिलजी कुनघाडकर, चामोर्शी तालुकाध्यक्षा तथा न.पं. सभापती रोशनीताई वरघंटे, धानोरा तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक साजनजी गुंडावार यांच्यासह नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

