
नितेश गट्टीवार| जिल्हा प्रतिनिधी

चामोर्शी, दि. ११ नोव्हेंबर :
भारतीय जनता पार्टीच्या चामोर्शी तालुकाध्यक्ष रोशनी वरघंटे यांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा आदरणीय हंसराजभैय्या अहिर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी हंसराजभैय्या अहिर यांना दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

या सदिच्छा भेटीदरम्यान भाजपाच्या विविध पदाधिकाऱ्यांची व ज्येष्ठ नेत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. यामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, भाजपा आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. देवराव होळी, माजी आमदार नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, श्रावण सोनटक्के, माजी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा उपाध्यक्ष अनिल पोहनकर, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भास्कर बुरे, जिल्हा सचिव दिलीप चलाख, किसान मोर्चाचे जिल्हा महामंत्री साईनाथ बुरांडे, ज्येष्ठ नेते माणिक कोहळे, तालुका महामंत्री शेषराव कोहळे, भाजयुमोचे जिल्हा सचिव नरेश अलसावार, युवा नेते यश गण्यारपवार, रामचंद्र वरवाडे, भाजपा ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष संजय चलाख, भारत धोडरे, उंदरू दुधबळे यांच्यासह भाजपाचे विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या भेटीमुळे भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेत पक्षसंघटना अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने अशा सदिच्छा भेटींना विशेष महत्त्व असल्याचे यावेळी दिसून आले.

