
गडचिरोली:- अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष कुणालभाऊ कोवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली शहरातील राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव शेडमाके चौक येथे शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.

यावेळी कुणालभाऊ कोवे यांनी शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या शौर्य, त्याग आणि आदिवासी समाजासाठी दिलेल्या योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेऊन समाजाच्या विकासासाठी आणि युवकांच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
विशेष म्हणजे, याच शहीद वीर बाबुराव शेडमाके चौकात कुणालभाऊ कोवे यांचा वाढदिवसाचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधवांनी कुणालभाऊ कोवे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

वाढदिवसाचा उत्सव साधेपणाने आणि शहीद वीर बाबुराव शेडमाके यांच्या स्मृतींना अभिवादन करून साजरा करण्यात आल्याने या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला.
यावेळी डॉ.वसंत कुळसंगेजी संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय शहीद वीर बाबुराव आदिवासी विकास प्रबोधन समीती,अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषदेचे कार्याध्यक्ष बादल मडावी,मिडिया जिल्हाप्रमुख रुपेश सलामे, कैलाश गेडाम, शहराध्यक्ष राज कुमरे, रोशन गेडाम, बुद्धभूषण कुळसंगे, हर्षवर्धन कुळसंगे यांच्यासह संघटनेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.

