
गडचिरोली/चामोर्शी, दि. ६ जुलै : व्हॉईस ऑफ मीडिया, तालुका चामोर्शी संघटनेची आढावा बैठक तालुकाध्यक्ष पुंडलिक भांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनेच्या विविध उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. तसेच पत्रकारितेतील समन्वय, पत्रकारांच्या विविध समस्या, सामाजिक विषयांवर प्रभावीपणे काम करण्याची गरज आणि आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान संघटनात्मक बळकटीसाठी विविध सूचना मांडण्यात आल्या. पत्रकारांच्या हितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात समाजहिताचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
या बैठकीला संघटनेचे सचिव विनोद खोबे, कोषाध्यक्ष अरुण गव्हारे, नितेश गट्टीवार, श्रावण वाकोडे, मारोती बारसागडे,सुधीर गडपायले, प्रफुल्ल कोटांगले यांच्यासह इतर सदस्य उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी संघटनेच्या आगामी उपक्रमांसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. पत्रकारांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासह समाजहिताची पत्रकारिता अधिक सक्षम करण्यासाठी संघटना कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले

