
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथी (बलिदान दिवस) निमित्त कोरची मंडल भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी डॉ. मुखर्जी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी आणि अखंडतेसाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण केले. त्यांच्या राष्ट्रवादी विचारांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांच्या कार्याचा आदर्श पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमाला तालुका उपाध्यक्ष नारदजी फुलारे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विनोद कोरेटी, मार्गदर्शक महेंद्र बोगा सर, प्रेमलाल उसेंडी, चिंताराम सोनफुल, अविनाश हारामी, धर्मेंद्र फुलारे तसेच अन्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

