
नितेश गट्टीवार गडचिरोली/चामोर्शी:
चामोर्शी तालुक्यातील कान्होली येथील बाळू मुकाजी शेंडे यांच्या घराला व तणशीच्या ढिगाला आग लागल्याने घराशेजारी असलेले साहित्य जळून खाक झाले .त्यात किरकोळ नुकसान झाल्याची घटना भेंडाळा महसूल विभागा अंतर्गत आज दि.२३ रोजी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान घडली अग्निशमन दलाच्या पथकाने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी बारा वाजता सुमारास अज्ञात व्यक्तीने चुली मधील राख खताच्या ढगांवर टाकल्याने हवेने पेट घेत जवळ असलेल्या बाळू शेंडे यांच्या घराला व तनशीच्या ढगाला आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक झाले त्यात किरकोळ नुकसान झाले या घटनेची माहिती काँग्रेस मीडिया तालुका अध्यक्ष विजय लाड यांना मिळताच त्यांनी त्वरीत अग्निशामक दलाला फोन केल्याने चामोर्शी नगर पंचायत अग्निशमन गाडी सह उमाजी सोमणकर व दिलीप कस्तुरे यांच्या पथकाने घटनास्थिळी दाखल होत आग आटोक्यातआणली तर भेंडाळा महसूल मंडळ अधिकारी सचिन सोमणकर व तलाठीविनोद चट्टे यांनी घटना स्थळी दाखल होत पंचनामा केला त्यात… हजाराचे नुकसान झाल्याचे दाखविण्यात आले असून पंचनामा तहसीली कार्यालयात सादर करण्यात येणार आहे


