
नितेश गट्टीवार,
गडचिरोली,दि.२३ मार्च:
गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत असतानाच आता पेट्रोलचीही टंचाई भासणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.चामोर्शी येथे आज दि.२३ मार्च रोजी पेट्रोल पंपावर गाड्यांच्या रांगाच रांगा दिसून येत होत्या.

चामोर्शी येथील पेट्रोलपंपावर माहिती घेतली असता उद्यापासून ३ दिवस पेट्रोलचा पुरवठा होणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गॅस सिलेंडर पाठोपाठ पेट्रोल डिझेलचाही तुटवडा भासणार आहे.
याचा त्रास ड्यूटीवर ये-जा करणाऱ्यासह सामान्य नागरिकांनाही होणार आहे. याकडे आता संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

