
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक जिल्ह्याचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीद्वारे पार पडली. या बैठकीस *आमदार रामदास मसराम* यांची प्रमुख उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या विकासकामांना प्राधान्याने मंजुरी देऊन निधीचे योग्य व समतोल वितरण करण्यात यावे, अशी मागणी सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी सन २०२६–२७ साठीच्या जिल्हा वार्षिक प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. तसेच चालू आर्थिक वर्षातील जिल्हा विकास निधीतून करण्यात आलेल्या खर्चाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

