
सायंकाळी ४ वाजेपर्यंत पाच मतदान केंद्रांवर ७३.३० टक्के मतदान; महिलांचाही लक्षणीय सहभाग

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (चामोर्शी) : नागपूर विभाग पदवीधर संघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील पाच मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडत असून, सायंकाळी ४ वाजेपर्यंत एकूण २,५३९ मतदारांपैकी १,८६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामुळे तालुक्यात ७३.३० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

मतदानाच्या आकडेवारीनुसार, एकूण १,८०० पुरुष आणि ७३९ महिला मतदारांची नोंद होती. त्यापैकी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १,३४३ पुरुष आणि ५१८ महिला मतदारांनी मतदान केले. यावरून पुरुषांसह महिला मतदारांनीही मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदविल्याचे स्पष्ट होते.
पाच मतदान केंद्रांवरील मतदानाची आकडेवारी नगर पंचायत संस्कृती सभागृह, चामोर्शी :एकूण ५९६ मतदारांपैकी ४३८ मतदारांनी मतदान केले. येथे ७३.४९ टक्के मतदानाची नोंद झाली.तहसील कार्यालय, चामोर्शी, खोली क्रमांक ०१ :एकूण ५९३ मतदारांपैकी ४१२ मतदारांनी मतदान केले. येथे ६९.४८ टक्के मतदान झाले.
पंचायत समिती सभागृह, चामोर्शी : एकूण ३७१ मतदारांपैकी २८९ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर सर्वाधिक म्हणजे ७७.९० टक्के मतदानाची नोंद झाली.
जिल्हा परिषद शाळा, आष्टी, खोली क्रमांक ०३ :एकूण ५६५ मतदारांपैकी ३९५ मतदारांनी मतदान केले. येथे ६९.९१ टक्के मतदान झाले.तहसील कार्यालय, मुलचेरा, खोली क्रमांक ०४ :एकूण ४१४ मतदारांपैकी ३२७ मतदारांनी मतदान केले. या केंद्रावर ७८.९९ टक्के मतदानाची नोंद झाली.
मुलचेरा केंद्रावर सर्वाधिक मतदान
सायंकाळी ४ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, मुलचेरा येथील तहसील कार्यालयातील मतदान केंद्रावर सर्वाधिक ७८.९९ टक्के मतदान झाले. त्याखालोखाल चामोर्शी पंचायत समिती सभागृहातील केंद्रावर ७७.९० टक्के मतदान झाले. तर तहसील कार्यालय, चामोर्शी येथील केंद्रावर सर्वांत कमी ६९.४८ टक्के मतदानाची नोंद झाली.
नागपूर विभाग पदवीधर संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीत चामोर्शी तालुक्यातील एकूण मतदानाचा टक्का ७३.३० वर पोहोचल्याने पदवीधर मतदारांचा सहभाग लक्षवेधी ठरला आहे. पाचही मतदान केंद्रांवरील आकडेवारीनुसार मतदारांनी लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला.

