A 60-year-old woman died tragically in a tiger attack.

चंद्रपूर प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील आगरझरी परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका ६० वर्षीय वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक ५ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारच्या वेळेस घडल्याची माहिती मिळाली आहे , सदर घटना मोहर्ली वनपरिक्षेत्रांतर्गत घडलेली असून मंदाबाई सूर्यभान मंगाम (वय ६० वर्षे, रा. आगरझरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
मंदाबाई मंगाम या आगरझरी येथील स्वतःच्या शेतात शेतीची कामे करीत असतांना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला करून त्यांना जागीच ठार केले,

घटनेची बातमी मिळताच मोहर्लीचे वनविभागाचे व पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरस्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर येथे रवाना केला.
मृत महिलेचे पती सूर्यभान लक्ष्मण मंगाम यांना प्रशासनाकडून तातडीने ५०,००० रुपयांची सानुग्रह मदत प्रदान करण्यात आली
A 60-year-old woman died tragically in a tiger attack.
वनविभागाने सदरील परिसरात कॅमेरा ट्रॅप (Camera Traps) लावले असून, वन कर्मचाऱ्यांकडून गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. गावकऱ्यांनी शेतात आणि जंगल परिसरात काम करताना विशेष खबरदारी बाळगावी, असे आव्हानही प्रशासनाने केले आहे. या घटनेचा पुढील तपास मोहर्ली वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे करत आहेत

