
पत्रकारांच्या प्रश्नांवर मंथन; निर्भीड, वस्तुनिष्ठ पत्रकारितेचा निर्धार
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती

जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली ,दि. ५ ऑक्टोबर : पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ असून, बदलत्या काळात पत्रकारांसमोर निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी संघटनात्मक ताकद आणि पत्रकारांमध्ये एकजूट आवश्यक आहे. याच उद्देशाने व्हॉईस ऑफ मीडिया (VOM) इंटरनॅशनल फोरमच्या विदर्भ विभागातर्फे ‘लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी’ या विषयावर एकदिवसीय कॅडर कॅम्पचे आयोजन वर्ध्यातील अनुपमा मंगल कार्यालय, नालवाडी येथे करण्यात आले. या कॅम्पला पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के होते. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्या हस्ते झाले, तर जय महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनेलचे संपादक प्रसाद काथे यांनी प्रमुख वक्ते म्हणून पत्रकारांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाला आमदार समीर कुणावार, माजी विधान परिषद सदस्य दादाराव केचे, आमदार राजेश बकाने, भाजप महामंत्री तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरिता विजय गाखरे, जिल्हा परिषद वर्धाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, डॉ. राजीव बोरले, जिल्हा माहिती अधिकारी मंगेश वरकड, विभागीय प्रदेशाध्यक्ष नरेंद्र देशमुख, विभागीय अध्यक्ष व्यंकटेश दुडमवार, पत्रकार प्रशांत देशमुख, राजेश मडावी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. स्वप्नील बेले, नगराध्यक्ष सुधीर पांगुळ, राज्य कार्याध्यक्षा महिला विंग रेणुका रविंद्र कोटंबकर तसेच जिल्हाध्यक्षा महिला विंग मृणाल देवेंद्र ढोक (रंदळे) यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पत्रकारांच्या प्रश्नांवर सखोल मंथन
कॅडर कॅम्पमध्ये पत्रकारितेची सद्यस्थिती, पत्रकारांच्या समस्या व अडचणी, पत्रकारांची सुरक्षितता, संघटनेची भूमिका, पत्रकारांच्या हक्कांसाठी लढा आणि बदलत्या डिजिटल युगात पत्रकारिता अधिक प्रभावी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना यावर सखोल चर्चा करण्यात आली.
पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी आणि सेवा आहे. एका बातमीच्या माध्यमातून अन्यायग्रस्ताला न्याय मिळवून देण्याची ताकद पत्रकारितेत आहे. त्यामुळे कोणत्याही दबावाला बळी न पडता वस्तुनिष्ठ, निर्भीड आणि जबाबदार पत्रकारिता करणे ही काळाची गरज आहे, असा सूर या कॅम्पमध्ये व्यक्त करण्यात आला.
पत्रकारांच्या प्रश्नांसाठी संघटितपणे आवाज उठविणे, पत्रकारांना येणाऱ्या अडचणींच्या वेळी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे आणि पत्रकारितेच्या मूलभूत मूल्यांचे संरक्षण करणे, यासाठी व्हॉईस ऑफ मीडियाच्या माध्यमातून संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
‘वंदे मातरम् कॅम्प’साठी निवड झालेल्या यश देशमुखचा विशेष सन्मान
दरम्यान, राष्ट्रीय युवा संमेलन २०२६ अंतर्गत ‘वंदे मातरम् कॅम्प’साठी देशभरातून महाराष्ट्र राज्याच्या प्रमुख प्रतिनिधी म्हणून वायगाव निपाणी येथील यश महेंद्र देशमुख यांची निवड झाल्याबद्दल कॅडर कॅम्पमध्ये त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
गडचिरोलीसह विदर्भातील पत्रकारांची मोठी उपस्थिती
या कॅडर कॅम्पमध्ये गडचिरोली जिल्ह्यातून व्यंकटेश दुडमवार, विनोद खोबे, श्रावण वाकोडे, हस्ते भगत, धनराज वासेकर, मारोती बारसागडे, प्रफुल कोटांगले, मिलिंद खोंड, निखिल कोलपकवार यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले.
पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ देण्यासोबतच पत्रकारांमध्ये संवाद, समन्वय आणि एकजूट वाढविणाऱ्या या कॅडर कॅम्पमुळे ‘लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी’ या अभियानाला विदर्भात नवी दिशा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
गडचिरोलीसह विदर्भातील पत्रकारांची मोठी उपस्थिती
या कॅडर कॅम्पमध्ये गडचिरोली जिल्ह्यातून व्यंकटेश दुडमवार, विनोद खोबे, श्रावण वाकोडे, हस्ते भगत, धनराज वासेकर, मारोती बारसागडे, प्रफुल कोटांगले, मिलिंद खोंड, निखिल कोलपकवार यांच्यासह विदर्भातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले.
पत्रकारांच्या प्रश्नांना संघटित व्यासपीठ देण्यासोबतच पत्रकारांमध्ये संवाद, समन्वय आणि एकजूट वाढविणाऱ्या या कॅडर कॅम्पमुळे ‘लढा पत्रकारिता आणि पत्रकारांसाठी’ या अभियानाला विदर्भात नवी दिशा मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

