
चालकाचा वाहणावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार शेतात घुसली; मूलच्या तरुणाचा मृत्यू, तिघे जण गंभीर
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.. 🖋️
मूल : मूल–नागपूर मार्गावर भोपाल गॅरेजजवळ मध्यरात्रीच्या सुमारास भरधाव कारचा भीषण अपघात झाला. धाब्यावरून जेवण करून मूलकडे परतत असताना रात्री सुमारे ११.१५ वाजता दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत मंगेश रोडे (रा. मूल) या तरुणाचा मृत्यू झाला असून कारमधील अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याचे समजते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या शेतात जाऊन घुसले. कारने अनेकदा पलटी मारल्याचे घटनास्थळावरील परिस्थितीवरून दिसून येते. या कारमध्ये एकूण चार जण प्रवास करीत होते.

अपघाताची माहिती मिळताच जखमींना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याने मूल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचा तपास सुरू असून अधिकृत माहिती मिळाल्यानंतर दुर्घटनेचे कारण स्पष्ट होणार आहे.
🖋️News Jagar..📝

