
प्रलय सहारे |प्रतिनिधी
भेंडाळा : भारतीय जनता पार्टी चामोर्शी तालुका अंतर्गत चामोर्शी तसेच आष्टी-घोट मंडळातील विविध पदांवर कार्यरत भाजपात असलेल्या कुणबी समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक साधुबाबा कुटी, चामोर्शी येथे उत्साहात पार पडली.
या बैठकीमध्ये पक्ष संघटन मजबूत करणे, कुणबी समाजातील पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वय वाढविणे, पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेणे तसेच आगामी काळात संघटनात्मक पातळीवर अधिक प्रभावीपणे कार्य करण्याबाबत चर्चा करण्यात आली. समाजातील विविध घटकांपर्यंत पक्षाची भूमिका व विकासकामे पोहोचविण्यासोबतच कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्यावरही यावेळी भर देण्यात आला.

बैठकीला विनोद गौरकर, संजय खेडेकर, पवन रामगीरकर, भुवनेश्वर चुधरी, विनोद भोयर, जीवनदास भोयर, निखिल चरडे, हिम्मत आभारे, रोहिदास धोटे, सौरभ पाल, शरदराव अलगमकर, निंबाजी मिसार, नाजूक पोरटे, सुभाष चुनारकर, भाऊजी दहेलकर, राजू भाकरे, खंडेराव बामनवाडे, धोंडबाजी मोरांडे, अरविंद म्हशाखेत्री, रुपेश चौधरी, नवनाथ चौधरी, विठ्ठल पाल यांच्यासह भाजपा कुणबी समाजातील पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीमुळे चामोर्शी तालुक्यातील कुणबी पदाधिकाऱ्यांमध्ये संघटनात्मक समन्वय आणि परस्पर सहकार्याला बळ मिळाले.

