
भरपावसात हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग; शेतकरी, महिला, युवकांसह सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा.
योगेश रामटेके (विशेष प्रतिनिधी )
सावली : महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती, रासायनिक खतांचे वाढते दर तसेच सर्वसामान्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने सावली येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले. विधिमंडळ पक्षनेते तथा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चाला भरपावसातही हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भुजाडे पेट्रोल पंप येथून सुरू झालेला हा मोर्चा शहरातून मार्गक्रमण करत तहसील कार्यालय सावली येथे पोहोचला. विशेष आकर्षण ठरलेल्या बैलगाडीवरून मोर्चा काढण्यात आला. काँग्रेस कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी आणि नागरिकांनी सरकारच्या धोरणांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला आक्रोश व्यक्त केला.
यावेळी बोलताना आ. विजय वडेट्टीवार यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. महागाई आणि वाढत्या खर्चामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याचे त्यांनी सांगितले. “ना खाऊंगा, ना खाने दूंगा” म्हणणाऱ्यांनीच देश लुटला, असा घणाघाती आरोपही त्यांनी केला.मोर्चानंतर शेतकरी, शेतमजूर, महिला, विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनातील प्रमुख मागण्यांमध्ये सन 2025-26 मधील धान उत्पादक शेतकऱ्यांना धानाचा बोनस तात्काळ देणे, 2017 पूर्वी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या यादीत समाविष्ट करणे, पात्र चालू कर्जदार शेतकऱ्यांना ₹50 हजार प्रोत्साहनपर अनुदान देणे, स्मार्ट मीटरची सक्ती बंद करणे आणि बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर काढणे, या मागण्यांचा समावेश आहे.उन्हाळी धान पिकासाठी गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी बारमाही उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांसाठी शेतपांदण रस्त्यांची कामे सुरू करणे, कृषी पंपांसाठी सोलरची सक्ती बंद करून पूर्वीप्रमाणे विद्युत कनेक्शन उपलब्ध करून देणे, तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या वाढलेल्या किमती कमी करण्याची मागणी करण्यात आली.OBC/SC/ST प्रवर्गातील पात्र उमेदवारांना आरक्षणाच्या हक्कांसोबत नियमानुसार खुल्या प्रवर्गातील संधींचा लाभ मिळावा, 2026-27 च्या जनगणनेत OBC साठी स्वतंत्र कॉलम ठेवावा आणि OBC विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.*
*श्रावणबाळ सेवा योजना व संजय गांधी निराधार योजनेचे मागील सहा महिन्यांपासून थकीत मानधन तात्काळ देणे, बंद असलेले ऑनलाइन पोर्टल सुरू करणे, रखडलेले घरकुल अनुदान वितरित करणे आणि घरकुल लाभार्थ्यांना नियमानुसार पाच ब्रास रेती मोफत उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेतील पात्र लाभार्थ्यांचे बंद झालेले अनुदान पुन्हा सुरू करणे, पात्र नवीन लाभार्थ्यांचा समावेश करणे, जल जीवन मिशनसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणे, प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या वीज बिल व देखभालीसाठी ग्रामपंचायतींना निधी देणे आणि ग्रामपंचायत प्रशासकांना नियमानुसार आवश्यक आर्थिक अधिकार देण्याची मागणी करण्यात आली.*
*सावली तालुक्यातील वाघ व इतर हिंसक वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून नागरिक व शेतकऱ्यांच्या जीविताची सुरक्षा करावी, वन्यप्राण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. तसेच मंदिरातील दान चोरी करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.याशिवाय मागील आठ महिन्यांपासून रखडलेल्या मनरेगा अंतर्गत VB-G-RAM-G योजनेच्या मंजुरी तात्काळ देण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली.*
*मोर्चामध्ये काँग्रेस नेते तथा माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद चंद्रपूर दिनेश चिटरनुरवार, तालुका अध्यक्ष नितीन गोहणे, शहराध्यक्ष कृष्णा राऊत, महिला काँग्रेस अध्यक्ष उषाताई भोयर, शहराध्यक्ष भारती चौधरी, नगराध्यक्ष साधना वाढई, माजी नगराध्यक्ष लता लाकडे, माजी सभापती पंचायत समिती सावली विजय कोरेवार, माजी सभापती पंचायत समिती सावली राकेश गड्डमवार, कृउबा सभापती राजू ठाकरे, युवा तालुका अध्यक्ष किशोर कारडे, माजी शहर अध्यक्ष तथा* *नगरसेवक विजय* *मुत्यालवार, प्रफुल वाळके नगरसेवक,* *नगरसेवक प्रीतम* *गेडाम, नगरसेवक सचिन संगिडवार,* *नगरसेवक नितेश रस्से,* *नगरसेवक,गुणवंत सुरमवार,*
*नगरसेवक पल्लवी ताटकोंडावर, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक नरेश सुरमवार, माजी नगराध्यक्ष,विलास यासलवार,कृषी* *उत्पन्न बाजार समिती संचालक निखिल सुरमवार, युवा शहर अध्यक्ष अंकुश शेंडे यांच्यासह तालुका, शहर, महिला व* *युवक काँग्रेसचे पदाधिकारी, नगरपंचायत पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते, शेतकरी, युवक, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित* *होते* .
*
*भरपावसातही मोर्चासाठी नागरिकांची मोठी उपस्थिती राहिल्याने सावली शहरात काँग्रेसच्या जनआक्रोश मोर्चाची जोरदार चर्चा झाली. सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.



