
मूल तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय पडोळे; उपाध्यक्ष गुरु गुरनुले, सचिव भोजराज गोवर्धन यांची अविरोध निवड..
जिल्हा प्रतिनिधी! न्यूज जागर
मूल : सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यात नेहमीच पुढाकार घेत सामाजिक व प्रशासकीय हित जोपासणाऱ्या मूल तालुका पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारिणीची निवड १६ ऑगस्ट २०२६ रोजी पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या सभेत करण्यात आली. अध्यक्ष राजू गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत नवीन पदाधिकाऱ्यांची अविरोध निवड करण्यात आली.

पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अनुभवी व कर्तव्यदक्ष पत्रकार संजय पडोळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी सामाजिक व सहकार क्षेत्रात सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार गुरु गुरनुले, तर सचिवपदी युवा पत्रकार भोजराज गोवर्धन यांची निवड झाली.
याशिवाय सहसचिवपदी रमेश माहुरपवार, तर कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ व अनुभवी पत्रकार प्रा. चंद्रकांत मणियार यांची सर्वानुमते अविरोध निवड करण्यात आली.
नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर अध्यक्ष संजय पडोळे यांनी उपस्थित पत्रकार संघाच्या सर्व सन्माननीय सदस्यांचे आभार मानले. सभेचे अध्यक्ष राजू गेडाम यांनी मनोगत व्यक्त करून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी पत्रकार राजू गेडाम, विनायक रेकलवार, युवराज चावरे, दीपक देशपांडे, रवी बोकारे, अशोक येरमे, गंगाधर कुनघाडकर, विजय पाकमोडे, वासुदेव आगळे यांच्यासह पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते. सभेचे आभार विनायक रेकलवार यांनी मानले. त्यानंतर स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.
📝Chetan Kamde News Jagar…

