
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि. १७ ऑगस्ट :
राज्यसभा खासदार श्रीमती मायाताई ईवनाते यांचे आज गडचिरोली येथे आगमनाने भारतीय जनता पार्टी अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री तथा माजी खासदार डॉ. अशोकजी नेते यांच्या गडचिरोली येथील निवासस्थानी त्यांचे अत्यंत आपुलकीच्या व उत्साही वातावरणात डॉ. अशोकजी नेते यांनी पुष्पगुच्छ प्रदान करून खासदार श्रीमती मायाताई ईवनाते यांचे स्वागत केले.

याप्रसंगी मा.खा. डॉ. अशोक नेते यांच्या परिवाराच्या वतीने सौ. अर्चना अशोक नेते यांनी खासदार श्रीमती मायाताई ईवनाते यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
या कौटुंबिक व स्नेहपूर्ण भेटीदरम्यान विविध सामाजिक व पक्षीय विषयांवर मनमोकळ्या वातावरणात संवाद झाला. यावेळी नगराध्यक्ष अँड. प्रणोती निंबोरकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष अरुण हरडे, महिला मोर्चा प्रदेश सचिव रेखाताई डोळस,भाजपा नेत्या डाँ.चंदाताई कोडवते,डॉ. आशिष कोरेटी, शहराध्यक्षा तथा न.प.सभापती सिमा कन्नमवार, जिल्हा सचिव तथा नगरसेविका वर्षा शेडमाके, नगरसेविका साक्षी बोलुवार,ज्ञानेश्वरी धंदरे,गोवर्धन चव्हाण,सुधाकर पेटकर, संजय बारापात्रे, यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भेटीमुळे पक्षातील ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्यातील स्नेह, आत्मीयता आणि संघटनात्मक एकजूट अधिक दृढ झाल्याचे वातावरण दिसून आले.

