
”विधिमंडळ नेते आमदार विजय वडेट्टीवारांच्या हस्तक्षेपाने शेतकऱ्यांना दिलासा”..
महावितरण अधिकाऱ्यांना फोनवर खडे बोल १२ तास वीजपुरवठ्याचे एम.डी. लोकेशचंद्र यांनी दिले आश्वासन..
जिल्हा प्रतिनिधी!

मूल – कृषी पंपांना अखंडित वीजपुरवठा मिळावा, सक्तीचे भारनियमन तातडीने बंद करावे आणि शेतकऱ्यांना खरीप हंगामात पुरेसा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी मूल तालुक्यातील शेतकऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांची मूल येथील विश्रामगृहात भेट घेतली. शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यानंतर आमदार वडेट्टीवार यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून तातडीने संपर्क साधत त्यांना चांगलेच खडे बोल सुनावले.
सध्या कृषी पंपांना केवळ आठ तास वीजपुरवठा होत असल्याने धान रोवणीसह खरीप पिकांची कामे अडचणीत आली आहेत. पिकांना पाण्याची अत्यंत गरज असताना अपुरा वीजपुरवठा मिळत असल्याने उत्पादनावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. तसेच सक्तीचे भारनियमन तातडीने बंद करणे, कृषी पंपांना नियमित व अखंडित वीजपुरवठा देणे, जळालेले व बिघडलेले ट्रान्सफॉर्मर तातडीने बदलणे, कमी व्होल्टेजची समस्या दूर करणे आणि रात्रीच्या अंधारामुळे वाढणाऱ्या वन्य प्राण्यांच्या धोक्याचा प्रश्न सोडविण्याची यावेळी मागणी करण्यात आली.
यावर आमदार वडेट्टीवार यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता, एम.डी. अधिकाऱ्यांशी मोबाईल वरुन चर्चा करत शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर महावितरण विभागाचे एम.डी. लोकेशचंद्र यांनी तात्काळ उद्या सकाळ पासूनच आठ तासांऐवजी १२ तास वीजपुरवठा सुरू ठेवण्याचे आश्वासन दिल्याचे निवेदन करते शेतकरी बंडू देऊरमले, रवींद्र वाळके,सुरेंद्र चिचघरे, मोरेश्वर शेंडे, सौरभ वाढई, दिनकर कुलमेथे,देवेंद्र देउरमले, विनोद राऊत, गुरुदास कांबळे,किशोर पेंदाम, धनराज रामटेके यांना सांगण्यात आले.
या निर्णयामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून धान रोवणीची कामे वेगाने पूर्ण करण्यास मदत होणार आहे. वीजपुरवठ्याबाबत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल शेतकऱ्यांनी आमदार विजय वडेट्टीवार यांचे आभार मानले. महावितरणने दिलेले आश्वासन तातडीने प्रत्यक्षात उतरवावे, अशी अपेक्षाही शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस संतोषसिंह रावत तालुका अध्यक्ष गुरु गुरूनुले नगराध्यक्ष एकता समर्थ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा मूल नगर परिषदेचे उपाध्यक्ष राकेश रत्नावार बांधकाम सभापती प्रशांत समर्थ नगरसेवक बंडू गुरनुले अतुल गोवर्धन विवेक मूत्यलवार, सभापती ललिता फुलझेले, समीक्षा कळसकर नलिनी अडपवार यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते. खेडी पाणी पुरवठा समितीनेही दिले पाण्यासाठी निवेदन गोसेखुर्द आसोलामेंढा तलावाचे पाणी खेडी साजातील टेकाडी पांदण रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांचे सिंचाई विभागाने पाईप लाईन टाकले नाही. वॉल दिले नाही त्यामुळे धान पिक पाणी वाळायला लागले असून यावर्षी पीक हाती येणार की,नाही या चिंतेत अनेक शेतकरी सापडले आहेत. यासाठी खेडी पाणी पुरवठा समिती तर्फे अध्यक्ष अजित दंडावार, गुरु गुरनुले व इतर शेतकरी यांचे वतीने आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांना लेखी निवेदन दिले.असता नहराचे पाणी द्यावे,अशी सूचना सिंचाई विभाग सावली यांना देणार असे आश्वासन दिले.
📝Chetan Kamde News Jagar…

