
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली/चामोर्शी : आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास जयरामपूर-मुधोली मार्गावर नाल्याजवळ प्रवासी बस अचानक रस्त्याच्या कडेला गेल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
बसचालक, वाहक तसेच दोन प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. घटनेनंतर काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र सर्वजण सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळला. रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळ ही घटना घडल्याने या मार्गाच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


