
गांधी चौकात पुष्पगुच्छ देऊन केला सन्मान; कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
गडचिरोली : शहरातील गांधी चौक येथे आज कराळे मास्तर यांचे CJP टीमच्या वतीने उत्स्फूर्त आणि आपुलकीने स्वागत करण्यात आले. यावेळी CJP टीमच्या सदस्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला.

कराळे मास्तर यांचे गांधी चौकात आगमन होताच उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले. यावेळी CJP टीमचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या उत्स्फूर्त स्वागतामुळे गांधी चौक परिसरात काही काळ आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या कार्याचा सन्मान करणे, हा CJP टीमच्या उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच भावनेतून कराळे मास्तर यांचा हा सन्मान करण्यात आला.
यावेळी CJP टीमच्या सदस्यांनी कराळे मास्तर यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमातून सामाजिक बांधिलकी, आपुलकी आणि कार्यकर्तृत्वाचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला.

