
जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली
गडचिरोली : अखिल भारतीय SC/ST विकास परिषदेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी डॉ. नरेंद्र उंदीरवाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त गडचिरोली येथील सर्किट हाऊस येथे परिषदेची आढावा बैठक आयोजित करण्यात आली. राष्ट्रीय महामंत्री तथा माजी आमदार डॉ. देवराव होळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत डॉ. नरेंद्र उंदीरवाडे यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र उंदीरवाडे यांचे अभिनंदन करून SC/ST समाजाच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन केले. संघटनेची राज्यभरात मजबूत बांधणी करून वंचित, आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविण्याची गरज असल्याचे त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले.

बैठकीदरम्यान संघटनेच्या विस्ताराला चालना देण्यासाठी विविध पदांवर नियुक्त्याही करण्यात आल्या. अमोल कुळमेथे यांची प्रदेश सचिवपदी, डॉ. मिलिंद रामटेके यांची विदर्भ अध्यक्षपदी, ज्योती उंदीरवाडे यांची जिल्हा संघटिका म्हणून, तर हंसराज उराडे यांची गडचिरोली तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील सामाजिक व संघटनात्मक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष राजकुमार घोडेस्वार, महिला प्रदेश प्रमुख अॅड. कविता मोहरकर, प्रदेश महासचिव डॉ. कुणाल कोवे, गौतम मेश्राम, वर्षा रामटेके, जितेंद्र रायपुरे, डॉ. कैलास नगराळे, शिल्पा आचला, भावना दरडे, संजय कुमरे, नितेश उंदीरवाडे, राजेश कोत्तावार, निखिल धार्मिक, ओमप्रकाश साखरे, मिलिंद बांबोडे, जगदीश सहारे, डॉ. कैलास नगराळे, कल्पना नरोटे, उमेश भांडेकर, हिटलर गिरडकर, दिपक देवतळे, प्राणजित वाकडे, तेजराम गोंगले, परिजन दहिवले, पंकजकुमार सिंग, सर्जन चव्हाण, संजय कोचे, तेजकिरण उराडे, पुरुषोत्तम रामटेके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीत संघटनेच्या आगामी कार्याचा आढावा घेण्यात येऊन SC/ST समाजाच्या विविध समस्या, संघटनात्मक विस्तार आणि सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर पुढील काळात अधिक प्रभावीपणे काम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला महाराष्ट्रात अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

