
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
“४५० लोकांची जीवघेणी कसरत; 1.50 लाख मंजूर तरीही पुलाचे काम रखडले!”
कोरची तालुक्यातील अल्लीटोला ग्रामपंचायत अंतर्गत मूंडीपार गावातील नागरिकांनी जीव धोक्यात घालून नाला ओलांडण्याची वेळ अजूनही कायम आहे. ग्रामसभेने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा पर्दाफाश झाला आहे.

निवेदनानुसार, मूंडीपार गावातून अल्लीटोला, बोरकट्टा, बोरेगाव, भिमपूर, कोरची या मार्गांवर दररोज सुमारे 400 ते 450 नागरिकांची ये-जा असते. मात्र नाल्यावर पूल नसल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
12 ते 15 विद्यार्थी दररोज शाळेसाठी हा मार्ग वापरतात

पावसाळ्यात नाला ओलांडणे जीवघेणे ठरते
रुग्णांना वेळेवर उपचार मिळणे कठीण
ग्रामसभेच्या माहितीनुसार,
सन 2021-22 मध्ये सिंचन विभागाकडून पूल बांधकाम मंजूर सुमारे ₹1.50 लाख खर्च मंजूर
मात्र 2025 पर्यंतही काम पूर्ण नाही
यामुळे पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून, पूर आल्यास संपूर्ण संपर्क तुटतो.
ग्रामस्थांचा संताप उफाळला
“निवेदन देऊनही प्रशासन झोपेत आहे. दरवर्षी तोच त्रास सहन करावा लागतो. एखादी मोठी दुर्घटना झाल्यावरच का जाग येणार?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला.
तत्काळ कारवाईची मागणी
ग्रामसभेने स्पष्ट इशारा दिला आहे की,लवकरात लवकर पूल बांधकाम सुरू न केल्यास आंदोलन छेडले जाईल संबंधित विभागाने तातडीने स्थळ पाहणी करून काम हाती घ्यावे
हा प्रकार केवळ मूंडीपारपुरता मर्यादित नसून, कोरची तालुक्यातील ग्रामीण पायाभूत सुविधांच्या दयनीय अवस्थेचे ज्वलंत उदाहरण ठरत आहे.

