
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची :- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी अलिकडेच कोरची तालुक्यातील अंगणवाडी केंद्र बेलगाव घाट तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगूल ला अचाणक भेट दिली. या भेटी दरम्याण महिला व बालविकास तसेच आरोग्य विभागाच्या विविध योजनांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. यावेळी गट विकास अधिकारी राजेश फाये उपस्थित होते.
अंगणवाडी केंद्रात त्यांनी बालकांची उपस्थिती, पोषण वितरण स्वच्छता, शैक्षणिक साहित्य व नोंदवही तपासल्या, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणुन घेतल्या तसेच सेवा अधिक प्रभाविपणे राबवण्याच्या सुचना दिल्या.
यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र कोटगुल ला भेट देऊन रुग्ण नोंदणी, औषध साठा, लसीकरण, माता व बाल आरोग्य सेवा यांचा आढावा घेतला, रुग्णांना वेळेत व दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, तसेच स्वच्छता व शिस्त राखण्याच्या सुचना त्यांनी आरोग्य कर्मचा-यांना दिल्या.
अंगणवाडी व आरोग्य विभाग यांच्यात समन्वय ठेवून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबवाव्यात असे निर्देश देत त्यांनी दोन्ही विभागांच्या कामाकाजाबाबत समाधान व्यक्त केले. या अचानक भेटीमुळे प्रशासनातील कार्यक्षमता अधिक वाढेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

