
सोनू वाळके, गडचिरोली जिल्हाप्रतिनिधी.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेची मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे मागणी
गडचिरोली – गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग रचनेनुसार मतदार यादीमध्ये अनेक त्रुटी आढळून येत असल्याने त्या त्रुटींचे निवारण करावे तसेच हरकती दाखल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद तर्फे करण्यात आली.

या संदर्भात परिषदेच्या वतीने मा. मुख्याधिकारी, गडचिरोली नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना उमेश उईके (जिल्हा महासचिव), पुष्पलता कुमरे (महिला जिल्हाध्यक्षा), विद्या दुग्गा (महिला जिल्हा सचिव), सुरज मडावी (जिल्हा सचिव), अमित तलांडे, माधुरी मडावी, पुष्पा कुमरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
परिषदेच्या प्रतिनिधींनी सांगितले की, प्रभाग रचनेदरम्यान अनेक मतदारांची नावे चुकीच्या प्रभागात दाखवण्यात आली असून काही ठिकाणी मतदारसंख्या व यादीतील आकडेवारीत विसंगती आहे. त्यामुळे नागरिकांना आपले नाव मतदार यादीत शोधताना अडचणी निर्माण होत आहेत.
या पार्श्वभूमीवर परिषदेकडून प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून त्रुटी दुरुस्त कराव्यात व हरकती नोंदविण्याची मुदत वाढवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

