
दिपोत्सवाच्या आनंदात सांस्कृतिक कार्यक्रमाची रंगत; मान्यवरांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नितेश गट्टीवार|जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली (देसाईगंज), दि. १० नोव्हेंबर : दीपावलीच्या मंगलमय पर्वाचे औचित्य साधून श्री गुरुदेव सार्वजनिक उत्सव मंडळ, पाथरगोटा यांच्या वतीने भव्य डान्स कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार रामदास मसराम यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले.

दीपावलीच्या आनंदोत्सवात आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमामुळे गावातील वातावरण चैतन्यमय झाले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन करताना आमदार रामदास मसराम यांनी मंडळाच्या उपक्रमाचे कौतुक केले. अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे ग्रामीण भागातील कला आणि सुप्त कलागुणांना व्यासपीठ मिळते, तसेच युवकांमधील कलात्मकतेला प्रोत्साहन मिळते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या प्रसंगी माजी सभापती परसराम टिकले, देसाईगंज तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, नगरपरिषद गटनेते विकास प्रधान, परशुराम ठाकरे, जावेद शेख, ढोरे सर, शंकर नखाते, केवळराम प्रधान, युवराज बुल्ले, गोपाल दोनाडकर, आनंदराव राऊत, जगणं करांकर, वासुदेव चौधरी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दीपावलीच्या उत्सवी वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. श्री गुरुदेव सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने आयोजित या उपक्रमामुळे गावातील सांस्कृतिक परंपरेला नवी ऊर्जा मिळाली.

