
वैरागड येथील धम्म प्रवचन सोहळ्यास महेंद्र ब्राह्मणवाडे यांची उपस्थिती; भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा अंगीकार करण्याचे आवाहन

जिल्हा प्रतिनिधी|गडचिरोली : समाजात समता, बंधुता, करुणा आणि सामाजिक न्यायाची मूल्ये रुजविण्यासाठी भगवान गौतम बुद्धांच्या धम्मविचारांची आजच्या काळातही नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे नेते महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केले. वैरागड येथे आयोजित धम्म प्रवचन सोहळ्यात उपस्थित राहून त्यांनी मार्गदर्शन केले.
भगवान गौतम बुद्धांनी दिलेला शांतता, करुणा, समता आणि मानवतेचा संदेश आजच्या समाजासाठी दिशादर्शक आहे. बुद्धविचारांचा अंगीकार केल्यास समाजातील भेदभाव दूर होऊन सामाजिक एकोपा आणि बंधुभाव अधिक दृढ होण्यास मदत होईल, असे मत महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी व्यक्त केले. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी धम्मविचारांचा प्रसार आणि सामाजिक प्रबोधन आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या धम्म प्रवचन सोहळ्याच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक एकात्मता आणि मानवतेच्या मूल्यांचा संदेश देण्यात आला.
यावेळी महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्यासोबत RPI नेते रोहिदास राऊत, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल कोठारे, गौरव येंप्रेड्डिवार, तुलारामजी राऊत, दिलीपजी मोटवानी, आत्माराम भाणारकर, विनोद बावनकर, माजी प्राध्यापक आनंदजी मेश्राम, दत्तू सोमणकर यांच्यासह इतर पदाधिकारी, ग्रामस्थ आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

