
काँग्रेसचे रवि सल्लम यांनी दिली बालविकास प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकण्याची इशारा!

सिरोंचा : सिरोंचा नगरपंचायत हद्दीतील चौदा आंगणवाडी केंद्रामधील शेकडो स्तनदा व गरोदरमाता मागील चार महिन्यांपासून पूरक पोषण आहार योजनेपासून वंचित असून येत्या आठवडाभरात महिला व बाल विकास विभागाने स्तनदा व गरोदरमातांना पोषण आहाराची वाटप न केल्यास येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकण्याची इशारा काँग्रेसचे युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते रवि सल्लम यांनी दिली आहे.
महिला व बाल विकास विभागाने सिरोंचा शहरातील स्तनदा व गरोदरमातांना मागील चार महिन्यांपासून पूरक पोषण आहार योजनेपासून वंचित कुपोषिताचे प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे.स्तनदा व गरोदरमातांना नियमित व वेळेवर पूरक पोषण आहार मिळणे अत्यंत गरजेचे असतांना सुद्धा त्यांना जाणून बुजून त्या योजनेपासून वंचित ठेवणे ही एक प्रकारची गुन्हा आहे.

स्तनदा व गरोदरमातांना तिसऱ्या तिमाहीत दररोज अतिरिक्त तीनशे कॅलरीज अन स्तनदा मातांना स्तनपान देतांना दररोज अतिरिक्त पाचशे कॅलरीजची आवश्यकता असते.आणि रोजचे पूरक पोषण आहार सेवनामुळे हे त्यांना भेटतात.गर्भाच्या आणि नवजात बाळाच्या मेंदू,हाडे आणि शरीराच्या योग्य वाढीव विकासासाठी अतिरिक्त पोषक घटकांची गरज असते.
गरोदर मातांना प्रसूतीनंतर आणि स्तनपानादरम्यान आईच्या शरीरातील ऊर्जा व खनिजांची कमतरता भरून काढण्यासाठी सकस आहार व पूरक पोषण आहाराची गरज असते.तसेच सुदृढ बालकांसाठी स्तनदा मातांना व गरोदर मातांना स्तनपानासाठी पूरक पोषण आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
असे असतांना सुद्धा मागील चार महिन्यांपासून महिला व बाल विकास विभागाकडून शहरातील शेकडो स्तनदा व गरोदर मातांना त्यांना त्यांच्या हक्काचे पूरक पोषण आहार योजनेपासून वंचित ठेवणे हे कितपत योग्य आहे…?दुर्दैवाने एखादं कुपोषित बालक जन्मास आल्यास नेमकं त्याची जबाबदारी कोण घेणार…?
एकंदरीतच महिला व बाल विकास विभागाने शहरातील शेकडो स्तनदा व गरोदर मातांना पूरक पोषण आहार योजनेपासून चार महिने दूर ठेवणे हे अत्यंत वेदनादायक आणि निंदनीय आहे.
म्हणूनच जर येत्या आठवडाभरात महिला व बाल विकास विभागाकडून शहरातील चौदा आंगणवाडी केंद्रामधील सर्व स्तनदा व गरोदर मातांना उत्कृष्ट पूरक पोषण आहाराची वाटपाला सुरुवात न केल्यास शहरातील सर्व स्तनदा व गरोदर मातांना सोबत घेऊन येथील बाल विकास प्रकल्प कार्यालयाला कुलूप ठोकण्याची इशारा काँग्रेसचे युवा नेते व सिरोंचाचे माजी सरपंच रवि सल्लम यांनी दिली आहे.

