
मूल (जिल्हा प्रतिनिधी) :
मूल पोलीस स्टेशन हद्दीतील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी देवराव तुकाराम वासेकर वय 50 वर्षे रा. सिंतला याला तात्काळ अटक केली आहे.
पीडित मुलगी तिच्या आईच्या सांगण्यावरून शेतातील कामासाठी शनिवारी आरोपी देवराव तुकाराम वासेकर वय 50 वर्ष यांच्यासोबत शेतात गेली होती. दरम्यान दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शेतात असताना आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडितेने घरी येऊन हा प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडित मुलगी आणि आरोपी देवराव तुकाराम वासेकर, वय 50 वर्षे, रा. सिंताळा हे नात्याने पीडितेचा चुलत आजोबा लागतो.

पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मूल येथे अपराध क्रमांक 613/2026, कलम 64 (2) (f) (1) बिएनएस सह कलम 4 व 6 पोस्को ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मूल पोलिसांच्या पथकाने तातडीने कारवाई करत आरोपी देवराव वासेकर यास अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले, मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि नरेश उरकुडे करीत आहेत.
… Chetan Kamde News Jagar….

