
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,दि.५ जूलै:
भारतीय जनता पार्टीच्या आदिवासी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सोशल मीडिया प्रमुखपदी सुरज मडावी यांची निवड झाल्याने गडचिरोली जिल्ह्यासह आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सुरज मडावी यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाची विचारधारा प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सातत्याने कार्य केले आहे. त्यांच्या संघटन कौशल्याची दखल घेत भाजप नेतृत्वाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविल्याचे मानले जात आहे.
सुरज मडावी यांनी आपल्या निवडीचे श्रेय भाजपा आदिवासी मोर्चा प्रदेशाध्यक्ष माजी आमदार डॉ. देवराव होळी यांना दिले असून माजी आमदार डॉ. होळी यांच्या मार्गदर्शना खाली आदिवासी मोर्चाचे काम करण्याची संधी मिळत असल्यामुळे माजी आमदार डॉ. होळी यांचे विशेष आभार मानले.
यावेळी माजी आमदार डॉ. देवराव होळी यांनी सुरज मडावी यांचे अभिनंदन करत, त्यांच्या नेतृत्वामुळे आदिवासी मोर्चाचे संघटन अधिक बळकट होईल तसेच पक्षाची भूमिका प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यात मोठे योगदान मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
या निवडीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा राज्य पातळीवर गौरव झाला असून, भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुरज मडावी यांना शुभेच्छा देत त्यांच्या भावी कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.

