
गडचिरोली,दि.३० जूलै:
समाजसेवेचा आदर्श ठरत असलेल्या ‘माणुसकीचा घास’ या उपक्रमांतर्गत गुरुवारी (दि. 30 जुलै 2026) गडचिरोली जिल्हा महिला रुग्णालय येथे सलग 1293 व्या दिवशी गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोफत भोजनाचे वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे, हा उपक्रम आमदार डॉ. मिलिंदजी नरोटे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या वतीने आयोजित करण्यात आला.
या सेवाभावी उपक्रमात न.प.बांधकाम सभापती अनिल कुनघाडकर, रेखाताई डोळस, घनश्याम वाढई, विनोद देवोजवार, शिक्षण सभापती हर्षल गेडाम, नगरसेवक सीमा कोसे कन्नमवार, शिल्पा हेमके, अंकुश हेमके, कोमल नैताम, अर्चना निंबोड, ज्ञानेश्वरी धंदरे, आरोग्य सभापती शेखर आखाडे तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत गरजूंना प्रेमाने अन्नदान केले.

वाढदिवस साजरा करण्याची वेगळी आणि समाजाभिमुख परंपरा जपत, आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलविणारे हे अन्नदान अनेकांसाठी आधार ठरत असून, समाजात माणुसकीचा संदेश देणारे कार्य म्हणून त्याची ओळख निर्माण झाली आहे.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की, “माणुसकीचा घास” हा उपक्रम केवळ अन्नदानापुरता मर्यादित नसून, समाजातील गरजूंप्रती संवेदनशीलता आणि सेवाभाव जपण्याचा एक प्रेरणादायी संदेश आहे.
दरम्यान, 2026 मधील कोणताही एक दिवस अन्नदानासाठी दत्तक घेण्यासाठी इच्छुक अन्नदात्यांनी ₹2,000 चे योगदान देऊन संजय मेश्राम (मो. 9423422404) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे संयोजक प्रसाद पवार आहेत.

