
मोवाड, दि. ३० जुलै
३० जुलै १९९१ रोजी वर्धा नदीला आलेल्या भीषण महापुराच्या दुर्घटनेला आज ३५ वर्षे पूर्ण झाली. या आपत्तीत जलसमाधी मिळालेल्या २२४ निष्पाप नागरिकांना नगर परिषद मोवाड येथील स्मृतिस्थळावरील स्मारकावर पुष्पांजली अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली.
याप्रसंगी काटोल-नरखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री. चरणसिंग ठाकूर यांनी दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, महापुरात वाहून गेलेले मोवाडचे गतवैभव विकासाच्या माध्यमातून पुन्हा उभे करू. तसेच वर्धा नदीला ‘सोन्याचा कवाड’ बनविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून मोवाडच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहू.
या श्रद्धांजली कार्यक्रमास निवड मुख्याधिकारी अमोल परिहार, नगर परिषद नरखेडचे नगराध्यक्ष मनोजभाऊ कोरडे, उकेश चव्हाण, नरेश अरसडे, श्री. राजु हरणे, प्रवीण लोहे, नगरसेवक सुरेश खसारे, अंकुश घावडे, विवेक लिखार, हिराचंद कडू, दिनेश पांडे, रऊफ दिवाण, निखिल कठाने, नरेश हेडाऊ, नगरसेविका भाग्यश्री मानेकर, रेखा बणाईत, मीनाक्षी बेले, वर्षा नासरे, प्रतिभा कालमेघ, डॉ. सोळंकी, मारोतराव बोरकर, राजू थनगन, यश चाळीसगावकर, हर्षल ढोरे
तसेच शाळेचे विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगर परिषद मोवाडच्या नगराध्यक्षा सौ. दर्शना हरीशजी ढोरे यांच्या उपस्थितीत सर्वांनी महापुरातील दिवंगतांना विनम्र अभिवादन करून त्यांच्या स्मृती चिरंतन जपण्याचा तसेच विकसित, समृद्ध आणि सक्षम मोवाड घडविण्याचा संकल्प केला.
कार्यक्रमाच्या शेवटी महापुरातील सर्व दिवंगतांना विनम्र अभिवादन करण्यात आले व त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, अशी प्रार्थना करण्यात आली.

