
जिल्हा प्रतिनिधी|नितेश गट्टीवार
गडचिरोली,द.३० जूलै: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तुळशीच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशांत मारबते व सिमरन कोटेकर, तर इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत सृष्टी मारबते, संस्कृती मारबते आणि कुमकुम हुमणे हे विद्यार्थी यशस्वी ठरले. एकूण पाच विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा ठसा उमटवला.

विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे शाळा परिसरासह संपूर्ण तुळशी गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या यशाबद्दल गटशिक्षणाधिकारी साहाळा साहेब, केंद्रप्रमुख गुरनुले सर, मुख्याध्यापक प्रभाकर गडपायले, विषय शिक्षक प्रदीप शहारे, कल्पना पिलारे, सीमा मडावी, टी. एम. गायकवाड, फिरोजकुमार फुलकवर, मीरा इंदुरे, प्रमोद खांडेकर, दुणेदार सर, गजापुरे सर तसेच ग्रामअधिकारी वाढई यांनी विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरव केला.
शाळेच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. या यशामुळे आगामी काळातही शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची प्रेरणा मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

