
श्री. नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
घराला आग लागली पण कशामुळे लागली याचा अंदाज लागला नाही.
घर मालकांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी गावकरी लोकांनी केली आहे.

कोचीनारा ग्रामपंचायत मध्ये अग्निशामक गाडी उपलब्ध करून द्या गावकरी लोकांची मागणी.
कोरची मुख्यालया पासून 2 किमी अंतरावर कोचिनारा येथील गोविंद सुरेंद्र देवांगन यांच्या घराला दिनांक 3 जानेवारी 2026 अचानक 9:30 रात्रोला अचानक आग लागल्यामुळे घराचे सर्व साहित्य जळून खाक झाले
प्राप्त माहितीनुसार देवांगन हे एका हॉटेलमध्ये मजुरी करण्यास गेले असताना अचानक 9.30 वाजता दरम्यान घराला आग लागली. आग लागली ची माहिती गावकऱ्यांना मिळतात गावकरी लोक धावून गेले. गावकरी लोकांनी घराला आग लागलेली विजवण्याचा प्रयत्न केला पण आग एवढी झपाट्याने वाढली होती. त्यामुळे आगीत संपूर्ण कवेलू फाटे व जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाले दिनाक 4/1/2026 ला तहसीलदार प्रशांत गड्डम व कु.ओमिता नारनवरे ग्राम महसुल अधिकारी तलाठी बेडगांव यांनी माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून पंचनामा केला .त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी गावकरी लोकांनी केली आहे.
लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे दिसून येते घटनास्थळी पाहणी व जळालेल्या घराचे घरमालकांच्या बयाना घेताना खालील पंच उपस्थिती होते गोविंद सुरेंद्र देवांगन, ममताताई गोविंद देवांगन,रूपराम देवांगन उपसरपंच, श्रावण घावडे पोलीस पाटील,तुलाराम धकाते चतुर भेळी,कांताप्रसाद जमकातन आदि मान्यवर उपस्थित होते. newsjagar
कोचिनारा ग्रामपंचायतला अग्निशामक गाडी देण्यात यावी जर अग्निशामक गाडी उपलब्ध असती तर ऐवढी घराचे नुकसान झाली नसती. त्यामुळे कोचिनारा ग्रामपंचायतला अग्निशामक गाडी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गावकरी लोकांनी केली आहे.

