
श्री.नंदकिशोर वैरागडे, विशेष जिल्हा प्रतिनिधी, गडचिरोली
कोरची.
दि. 7/1/26
शासनाकडून कोट्यावधी रुपयाचा निधी येऊनही तालुक्यातील विकास कामे रखडली तर मात्र सहन केले जाणार नाही.वारंवार बैठका घेऊन, सूचना देऊनही स्थानिक अधिकारी ऐकत नसतील तर अश्या अधिकाऱ्यांच्या निलंबनासाठी शासनाकडे जोरदार पाठपुरावा करावा लागेल असा कडक इशारा गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिशांत पांड्या यांनी दिला आहे.कोरची येथील तहसील कार्यालयात घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही तीव्र नाराजी व्यक्त केली. newsjagar
कोरची येथे तहसील कार्यालयाच्या सभागृहात आज पार पडलेल्या या महत्त्वाच्या आढावा बैठकीत गडचिरोलीचे जिल्हाधिकारी अभिशांत पांड्या यांनी विविध विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलावून विभागनिहाय प्रगती अहवाल मागितला.कर्मचारी वसाहतीचे अर्धवट राहिलेले काम, रब्बी हंगामात कृषी क्षेत्र वाढविणे, विधवा व परीतक्त महिलांना आर्थिक लाभ देणे, धान्य खरेदी केंद्र सुरू करणे,सोहले माईन मधील कच्चामाल चोरी प्रकरण अशा अनेक महत्त्वाचे विषयावर त्यांनी खडसल्ला बोलत अधिकारी व कर्मचाऱ्यांना जाब विचारला, मात्र कोणत्याही अधिकाऱ्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी चांगले संतापले. शासन मोठ्या प्रमाणात निधी पाठवतो,तरीही तालुक्याचा विकास होत नाही.अशा निष्काळजी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करावा लागेल असे स्पष्ट शब्दात त्यांनी सुनावले. बैठकीत उपस्थित अधिकारी व कर्मचारी या इशाराने चांगलेच हादरले. Officers who neglect their duties will be suspended- dist.collector
बैठकीनंतर जिल्हाधिकारी अभिशांत पांड्या यांनी कोरचीतील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेला भेट दिली. मात्र शाळेचा इमारतीला खेटून सार्वजनिक स्वच्छतागृह असल्याने वर्ग खोल्यात घाणेरडा वास येत असल्याचे लक्षात आले. यावरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ दुरुस्तीच्या सूचना दिल्या. यावेळी कोरची नगरपंचायत मध्ये चाललेल्या बांधकामाच्या अनियमितता, भ्रष्टाचार आणि विविध समस्याचे निवेदन गावकऱ्यांनी दिले. त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन पांड्या यांनी दिले. याच वेळी त्यांनी महिला मंडळाच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या माती रोटी हॉटेलला भेट दिली. महिलांच्या प्रयत्नांचे कौतुक केले तसेच महूआ पासून विविध पदार्थ तयार करणाऱ्या एनजीओच्या कामाची पाहणी करून स्थानिक उद्योगाला चालना देणाऱ्या दृष्टीने मार्गदर्शन केले. जिल्हाधिकाऱ्यांच्या या कडक भूमिकेमुळे कोरची तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली असून रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त केली.

