
काँग्रेस च्या गडचिरोली नगर परिषद निवडणूक प्रचार सभेला उपस्थित मतदारांना आमदार विजय वडेट्टीवार यांचे आव्हान
गडचिरोली – गडचिरोली नगर परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने माजी नगराध्यक्ष सुरेश सावकार पोरेड्डीवार यांच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत नगराध्यक्षा पदाच्या उमेदवार कविताताई पोरेट्टीवार आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपस्थित नागरिकांशी संवाद साधला तसेच सर्वांना निवडून देण्याचे आवाहन केले.
देशातील शेतकरी, शेतमजूर, कामगार, कर्मचारी सर्व सामान्य नागरिक यांना महागाईच्या खाईत लोटून महाराष्ट्र राज्याची गुजरात चरणी अस्मिता गहाण ठेवणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला. या लुटारू सरकारला येणाऱ्या निवडणुकीत आपण काँग्रेस पक्षाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून धडा शिकवा.

गडचिरोली जिल्ह्यात सत्ताधाऱ्यांकडून खनिज संपत्तीची लूट सुरू आहे. तर दुसरीकडे स्थानिक बेरोजगारांना रोजगारापासून दूर करण्याचे पाप हे निष्ठुर सरकार करत आहे. मागील 5 वर्षाच्या काळात नियोजनाअभावी सत्ताधारी भाजपने गडचिरोली नगरपरिषदेची पूर्णतः वाट लावली. विकासकामांच्या कंत्राटातून कोट्यावधींचा भ्रष्टाचार केला. सर्वसामान्यांच्या जीवावर उठलेल्या या हेकेखोर व डल्लेबाज सरकारला तुम्हीच जागा दाखवा.
या आयोजित सभेस नगर परिषद निवडणूक गडचिरोली जिल्हा प्रभारी संदेश चिंगलकर, जिल्हाध्यक्ष महेन्द्र ब्राम्हणवाडे, माजी नगराध्यक्ष सुरेशजी पोरेड्डीवार, ॲड. राम मेश्राम, मनोहरजी पोरेटी, सतीश विधाते, प्रभाकर वासेकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष कविता मोहरकर, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कविताताई पोरेड्डीवार, यांचेसह नगरसेवक पदाकरिता उभे असलेले सर्व उमेदवार, गडचिरोली जिल्हा काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

